इथे भरवला जातो मुलींचा मेळावा | रोचक माहिती मराठी भाषे मध्ये | लोकमत मराठी न्यूज़

2021-09-13 1

आता पर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे मेळावे पाहिले असतील त्यामध्ये कृषी मेळा, खाद्य मेळा किंवा वाहन मेळा. पण युरोपातील स्टारा जागोरामध्ये चक्क उपवर मुलीच्या मेळाव्याचे आयोजन केले जाते व ते ही वर्षातून चारदा. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या बुल्गेरीयातील लोक असे मेळाव्यांचे आयोजन करतात. मागील अनेक पिढ्यांपासून अशा मेळ्यांचे आयोजन केले जात आहे . या मेळ्याची खासियत म्हणजे , हे लोक आपल्या उपवर मुलीसाठी चांगला वर शोधू शकत नाहीत वा त्यांचा धुमधडाक्यात विवाह करू शकत नाहीत, ते मुलींना मेळ्यामध्ये घेवून येतात या तरुणीही मनाजोग्या पतीचा शोध घेण्यासाठी अतिशय नटूनथटून असतात. मनाजोगता वर भेटला की, मंगल कार्य घडून येते.

Videos similaires